उद्दिष्टे आणि कार्ये
उद्दिष्टे
महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरण (एमएमजीपीए)ची प्राथमिक उद्दिष्टे :-
वैद्यकीय वस्तूंची खरेदी हे प्राधिकरणाची उद्दिष्टे असतील, –
- महाराष्ट्र शासनाच्या सार्बजनिक आरोग्य विभागासाठी ।
- परिपूर्ण (टर्न-की) प्रकल्प वगळून महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधिद्रव्ये विभागासाठी
- महाराष्ट्र शासनाचा इतर कोणताही विभाग, नागरी किंवा ग्रामीण स्थानिक प्राधिकरणे अथवा राज्य शासनाद्वारे कोणत्याही कायद्याद्वारे किंवा त्याअन्वये स्थापन केलेले इतर कोणतेही प्राधिकरण किंवा संस्था यांनी तशी विनंती केल्यास, त्यांच्यासाठी,
- केंद्र सरकार, इतर राज्य शासने किंवा संघ राज्यक्षेत्रे, किंवा इतर राज्य शासनांची नागरी किंवा ग्रामीण स्थानिक प्राधिकरणे अथवा केंद्र सरकारने किंवा अन्य राज्य शासनाने किंवा संघ राज्यक्षेत्राने कोणत्याही कायद्याद्वारे किंवा त्याअन्वये स्थापन केलेले अन्य प्राधिकरण किंवा संस्था यांनी तशी विनंती केल्यास, त्यांच्यासाठी :
- खाजगी रुग्णालये, विश्वस्त संस्थेची रुग्णालये, खाजगी संघटना, अशासकीय संघटना, विश्वस्त संस्था किवा आंतरराष्ट्रीय संघटना यांनी तशी विनंती केल्यास, त्यांच्यासाठी, करणे ही खरेदी प्राधिकरणाची उद्दिष्ट्ये असतील
कार्ये
खरेदी प्राधिकरण, वैद्यकीय वस्तूंच्या खरेदीच्या प्रयोजनार्थ, पुढील अधिकारांचा वापर करील व पुढील कार्ये पार पाडील –
- खरेदीची कोणतीही वित्तीय योजना तयार करणे व तिचा आढावा घेणे.
- कार्यकारी समितीच्या कामकाजाचे पर्यवेक्षण करणे.
- खरेदी प्राधिकरणाच्या कार्यांशी संबंधित असलेले धोरणात्मक निर्णय घेणे.
- वैद्यकीय वस्तुंच्या संपूर्ण खरेदीसाठी व त्यांचा पुरवठा करण्यासाठी राज्य शासनाने किंवा इतर कोणत्याही प्राधिकरणाने करणे आवश्यक असलेल्या कोणत्याही बाबींवर किंवा प्रस्तावावर राज्य शासनाला शिफारस करणे.
- औषधे व उपकरणे यांच्या खरेदी संबंधात राज्य शासनाला खरेदी धोरणाची शिफारस करणे
- माल घेणाऱ्याच्या ठिकाणी वैद्यकीय वस्तु वेळेवर उपलब्ध करून देण्यासाठी व त्यांचे वितरणकरण्यासाठी वैद्यकीय वस्तुंची खरेदी करणे आणि त्यासाठी परिपूर्ण (टर्न की) प्रकल्पांची अंमलबजावणी करणे :
- खरेदी प्रयोजनार्थ इतर सरकारी अभिकरणांशी व विभागांशी समन्वय साधणे,
- वैद्यकीय वस्तुंचा सुरळीत पुरवठा करण्यासाठी खरेदी प्रक्रियेवर देखरेख करणे.
- कोणत्याही खरेदी प्रक्रियेच्या नियोजनावर व अंमलबजावणीवर देखरेख करणे किंवा अन्यथा, त्याचे पर्याप्त पर्यवेक्षण करण्याची खात्री करणे, ज्याचा खर्च, संपूर्णतः किंवा अंशतः, खरेदी प्राधिकरण निधीतून भागविण्यात येईल;
- वैद्यकीय वस्तुंच्या खरेदी प्रक्रियेमध्ये पारदर्शकता व उत्तरदायित्व आणणे आणि
- विहित करतायेतील असे इतर अधिकार व कार्य