परिचय
महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरण (एमएमजीपीए) ची स्थापना 17 मार्च 2023 रोजी, आदेशान्वये महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरणामार्फत विक्षित वैद्यकीय वस्तूंची एकाच ठिकाणी खरेदी आणि परिपूर्ण (टर्न-की) प्रकल्पांची अंमलबजावणी, उच्च दर्जाची पारदर्शकता, निःपक्षता, न्यायबुद्धी आणि योग्य व एकरुप दराने आणि अपेक्षित गुणवत्ता व प्रमाणात राज्य शासनाच्या अखत्यारीतील आरोग्य संस्थांसाठी आणि इतर विवक्षित आरोग्य संस्थांसाठी वेळेत पुरवठा करण्याचे सुनिश्चित करण्यासाठी आणि तत्संबंधित व तदानुषंगिक बाबींकरिता विशेष तरतुदी करण्यासाठी नवीन कायदा अधिनियमित करण्यात आला आहे.